Contact Banner

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

 

cooperative-institutions-lokshahi-din-jalgaon-september-7-2026

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ४ : सहकारी संस्थांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा लोकशाही दिन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव यांच्या गणेश कॉलनी शाखेतील प्रशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव महेशकुमार गायकवाड यांनी दिली.






सहकारी संस्थांशी संबंधित सर्व लोकशाही दिन यापुढे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या वतीने स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी याच ठिकाणी स्वतंत्र जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सहकारी संस्था, सभासद तसेच संबंधित नागरिकांनी या लोकशाही दिनाची नोंद घेऊन आपल्या तक्रारी व समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.