Contact Banner

दसनूर येथे २५ सप्टेंबरला गणपती विसर्जनानिमित्त दिंडी सोहळा

 

dasnur-ganpati-visarjan-dindi-sohala-september-25

दसनूर येथे २५ सप्टेंबरला गणपती विसर्जनानिमित्त दिंडी सोहळा

सिंगणूर, ता. रावेर | प्रतिनिधी – हेमंत चांदवे-



dasnur-ganpati-visarjan-dindi-sohala-september-25
लेवाजगत मार्फत जाहिरात 


सिंगणूर येथून जवळच असलेल्या दसनूर येथे जय भवानी गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीने गणपती विसर्जनानिमित्त दि. २५ सप्टेंबर रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिंडी सोहळ्यात श्री संत मुक्ताबाई बाल टाळकरी वारोली भजनी मंडळ, गायक गोपाल महाराज वडझिरी व मुकुंदा महाराज नागुरखेडा सहभागी होणार आहेत. तसेच मृदुंग वादक तेजस महाराज वारोली यांच्यासह दसनूर, सिंगणूर, इंदिरानगर परिसरातील विविध भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.

दिंडी सोहळ्यादरम्यान भक्तिमय वातावरणात भजन, टाळ-मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, परिसरातील भजनी मंडळी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जय भवानी गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसनूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.