Contact Banner

आविष्कार २०२६ : प्रथम फेरीतील विजेत्यांची झोनल फेरीसाठी निवड

 

godavari-engineering-avishkar-2026-first-round-successful

आविष्कार २०२६ : प्रथम फेरीतील विजेत्यांची झोनल फेरीसाठी निवड

godavari-engineering-avishkar-2026-first-round-successful
जाहिरात (लेवाजगत न्यूज मार्फत )



लेवाजगत म्यूज जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘आविष्कार २०२६’ संशोधन स्पर्धेची प्रथम फेरी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, संशोधन पद्धतींची ओळख व्हावी आणि नवनवीन संकल्पना व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधनाला चालना मिळावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

या प्रथम फेरीत ३१ टीममधील एकूण ८७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध संशोधन संकल्पना पोस्टरच्या माध्यमातून सादर करत पर्यवेक्षकांसमोर आपल्या विषयाची संकल्पना, उद्दिष्टे व संशोधनाची दिशा प्रभावीपणे स्पष्ट केली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरणाची पाहणी केली. विद्यार्थी दशेतच संशोधनावर काम करणे, नवनवीन गोष्टी शिकणे आणि आपल्या कल्पनांना संशोधनाची दिशा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक अनुभव व आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘आविष्कार’सारख्या स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. हेमंत इंगळे (प्रमुख, ई अँड टी सी), डॉ. नितीन भोळे (प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (प्रमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), प्रा. महेश पाटील (प्रमुख, विद्युत विभाग), कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल बर्‍हाटे व प्रा. मयूर ठाकूर यांच्यासह प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

स्पर्धेत ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स; कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ; प्युअर सायन्स; एग्रीकल्चर अँड अ‍ॅनिमल हसबंडरी; तसेच इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या गटांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रथम फेरीतील विजेते

ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स

  • ग्रुप १ : साहिल भोळे, देवयानी पाटील
  • ग्रुप २ : जानवी राजपूत, भावेश सुपे, साक्षी घोगरे, खुशबू वारके, स्वेजल पारसे

कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ

  • ग्रुप १ : पियुष बाविस्कर, ऋषिकेश बाविस्कर, लालेश पाटील, सुमित निकम, तन्मय पाटील

प्युअर सायन्स

  • ग्रुप १ : कल्याणी शिंदे, मानसी खंबायटे, सानिका पाटील, वैशाली बरगत, आरती मोगरे
  • ग्रुप २ : लक्ष्मी चौधरी, मयुरी दीक्षित, सत्यम सूर्यवंशी

एग्रीकल्चर अँड अ‍ॅनिमल हसबंडरी

  • ग्रुप १ : मयूर कोळी, कोमल पाटील, निखिल काथार, पवन चौधरी
  • ग्रुप २ : पार्थ पाटील

इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी

  • ग्रुप १ : प्रणव थोरात
  • ग्रुप २ : युक्ता तळेले, उर्वशी पाटील, आदित्य पवार, सुमित राठोड

प्रथम फेरीतील विजेत्या विद्यार्थ्यांची पुढील झोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक येथे होणार आहे.

स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा, प्रा. महेश एच. पाटील व डॉ. तुषार कोळी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अतुल बर्‍हाटे व प्रा. मयूर ठाकूर यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

‘आविष्कार २०२६’च्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजी) यांनी आयोजक, प्राध्यापकवर्ग व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.