Contact Banner

गोदावरी फाऊंडेशनच्या महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात

 

godavari-foundation-colleges-janmashtami-dahihandi-festival-celebration-jalgaon

गोदावरी फाऊंडेशनच्या महाविद्यालयांत श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात

लेवा जगत न्यूज जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर), जळगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन येथे कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन व आरतीने झाली. यावेळी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







गोपाळकाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मुलींच्या विविध तुकड्यांनी ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मानवी मनोरे रचले. यावेळी अनुराधा सुरडकर हिने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.

गोदावरी आयएमआर येथे कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन व आरतीने झाली. येथेही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत मानवी मनोरे रचले. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात अनिकेत चौधरी याने दहीहंडी फोडली.

दोन्ही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाची रंगत वाढवली. राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा, भजन व संगीत सादरीकरण अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण भक्तीवर आधारित गाणी व भजने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्यांसोबतच भारतीय संस्कृती व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन येथील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले, तर गोदावरी आयएमआर येथील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.