धनाजी नाना महाविद्यालयात विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर मार्गदर्शन
धनाजी नाना महाविद्यालयात विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर मार्गदर्शन
लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील वाणिज्य विभाग आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), सावदा शाखेच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावदा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शाखा व्यवस्थापक विजय पाटील, उपशाखा व्यवस्थापक उमाकांत वानखेडे तसेच विकास अधिकारी सुनील सोनगिरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, विमा क्षेत्रात सध्या तसेच भविष्यात रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे केवळ नोकरीची संधी म्हणून न पाहता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबत समाजसेवा करण्याची दुहेरी संधी म्हणून पाहावे, असे आवाहन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी आणि मिळणाऱ्या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. रवी केसुर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. आरती भिडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. निखिल वायकोळे, प्रा. बी. एस. पाटील, डॉ. विवेक श्रावगे, प्रा. यश भारंबे, प्रा. आकाश तायडे आणि प्रा. गणेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत