कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांनी केले गोदावरी साप्ताहिकाचे कौतुक
कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांनी केले गोदावरी साप्ताहिकाचे कौतुक
जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुलगुरूंनी गोदावरी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांसह ‘गोदावरी साप्ताहिक’चे कौतुक केले.
या भेटीदरम्यान डॉ. प्रशांत सोळंके यांनी गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती कुलगुरूंना दिली. तसेच वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाला दिले जाणारे योगदान याबाबतही चर्चा करण्यात आली.
गोदावरी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देणारे ‘गोदावरी साप्ताहिक’ यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांना भेट देण्यात आले. या साप्ताहिकाच्या माध्यमातून संस्थेच्या शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांनी गोदावरी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. ही सदिच्छा भेट शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील परस्पर समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत