Contact Banner

जळगाव नॉर्थ रोटरीतर्फे महादेव हॉस्पिटल येथे ‘हेमोडायलिसिस सेंटर’चा शुभारंभ ५ अत्याधुनिक मशिन्स गरजू रुग्णांच्या सेवेत समर्पित

 

jalgaon-north-rotary-hemodyalysis-center-mahadev-hospital-5-modern-machines

जळगाव नॉर्थ रोटरीतर्फे महादेव हॉस्पिटल येथे ‘हेमोडायलिसिस सेंटर’चा शुभारंभ

५ अत्याधुनिक मशिन्स गरजू रुग्णांच्या सेवेत समर्पित


jalgaon-north-rotary-hemodyalysis-center-mahadev-hospital-5-modern-machines


जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ‘ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट’ अंतर्गत आकाशवाणी चौक येथील महादेव हॉस्पिटलमध्ये ‘जळगाव नॉर्थ रोटरी हेमोडायलिसिस सेंटर’चा शुभारंभ उत्साहात पार पडला.

या प्रकल्पांतर्गत रुग्णालयात ५ अत्याधुनिक हेमोडायलिसिस मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे किडनी विकाराने त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक हेमोडायलिसिस उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्यातून प्रकल्प साकार

आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने साकारलेल्या या ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे होस्ट स्पॉन्सर रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ (आरआय डिस्ट्रिक्ट ३०३०) असून, इंटरनॅशनल स्पॉन्सर रोटरी क्लब ऑफ सिंगापूर (आरआय डिस्ट्रिक्ट ३३१०) आहे. तसेच या उपक्रमाला द रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनलचे विशेष सहकार्य लाभले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास आयपीडीजी ज्ञानेश्वर शेवाळे आणि आरआय डिस्ट्रिक्ट ३०३०चे जिल्हा गव्हर्नर (२०२६-२७) रोटेरियन डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. उल्हास पाटील, रोटेरियन राजेंद्र भामरे आणि डॉ. वैभव पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाचे कौतुक केले.

पदाधिकारी व सदस्यांचे योगदान

कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन रो. चंदन कोल्हे आणि रो. डॉ. शौनक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष रो. उमेश पाटील, सचिव रो. रुपेश सरोदे, प्रोजेक्ट सचिव रो. प्रशांत अग्रवाल तसेच रो. बिपिन पाटील, रो. हितेंद्र धांडे आणि रो. भरत कर्डिले यांनी विशेष परिश्रम घेतले.

जळगाव व परिसरातील गरजू रुग्णांना सुलभ आणि नियमित हेमोडायलिसिसची सुविधा मिळणार असल्याने हा प्रकल्प खान्देशातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.