Contact Banner

रिंगरोडवरील स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश; चालक, मालकावर गुन्हा

 

jalgaon-ring-road-spa-center-sex-racket-busted-police-case-registered

रिंगरोडवरील स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश; चालक, मालकावर गुन्हा






लेवाजगत न्यूज जळगाव : रिंगरोड चौकातील आरसी प्लाझा या पाच मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पर्दाफाश केला. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला. या कारवाईत नेपाळ, दार्जिलिंग (प. बंगाल), मणिपूर आणि सिक्कीम येथील सहा महिलांची सुटका करण्यात आली. त्यांचे वय २५ ते ३० वर्षांदरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिलें यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथक, अमानवीय अवैध वाहतूक प्रतिबंध विभाग आणि जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. दामिनी पथकाला स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मागील वर्षभरापासून या सेंटरवर पाळत ठेवण्यात आली होती.

पोलिसांनी देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याची खात्री करण्यासाठी डमी ग्राहक पाठवला. त्याच्याकडून ‘विशेष सेवा’ देण्यासाठी ६ हजार रुपये ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले. पैसे भरल्यानंतर रूममध्ये जाण्यापूर्वी ठरल्याप्रमाणे डमी ग्राहकाने पोलिसांना मिस्ड कॉलद्वारे इशारा केला. त्यानंतर बाहेर थांबलेल्या पोलिस पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान नेपाळ व दार्जिलिंग येथील प्रत्येकी एक, तर मणिपूर व सिक्कीम येथील प्रत्येकी दोन महिलांची सुटका करण्यात आली. त्यातील एका महिलेवर व्यवस्थापक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी स्पा सेंटरचा चालक नीरसिंग पांड्या (३६, रा. मुखर्जीनगर, रतलाम, मध्य प्रदेश) आणि जागा मालक राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण (जळगाव) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.