Contact Banner

जामनेर–पहूर मार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने 407 वाहन उलटले

 


जामनेर–पहूर मार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने 407 वाहन उलटले

दोन ते तीन जण गंभीर जखमी; वाहनात शासकीय शालेय पोषण आहाराचे साहित्य

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे

लेवाजगत न्युज पहूर, ता. जामनेर : जामनेर–पहूर मार्गावर शेंदुर्णी जवळ आज, १५ सप्टेंबर २०२६ रोजी 407 वाहनाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर उलटल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

या अपघातात वाहनातील दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अपघातग्रस्त 407 वाहनामध्ये शासकीय शालेय पोषण आहाराचे साहित्य असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या अपघातामुळे पोषण आहाराच्या साहित्याचेही नुकसान झाल्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताबाबत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, जखमींची ओळख काय आहे आणि त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.