Contact Banner

डॉ.केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन ‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल आरोग्यासाठी’ संदेशातून जनजागृती

 

ketaki-patil-nursing-college-5-km-walkathon-world-heart-day-jalgaon

डॉ.केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन

‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल आरोग्यासाठी’ संदेशातून जनजागृती


Lewajagat


लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे जागतिक हृदय दिनानिमित्त ‘प्रत्येक ठोका महत्त्वाचा, प्रत्येक पाऊल मोलाचे’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीपर ५ किलोमीटर वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे तसेच हृदयविकारासंदर्भात समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

वॉकथॉनमध्ये नर्सिंगचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच सहभागी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नियमित चालणे, व्यायाम, संतुलित आहार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

यावेळी रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. हृदयाचे आरोग्य, निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि हृदयविकार प्रतिबंध या विषयांवर विद्यार्थ्यांनी सर्जनशील रील्स तयार करून आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे मांडला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण, सामाजिक सहभाग आणि सर्जनशील जनजागृती यांचा संगम साधण्याची संधी मिळाली. हृदयविकार प्रतिबंध, निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि शारीरिक सक्रियतेबाबत विद्यार्थी व समाजात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारून निरोगी हृदय व निरोगी जीवनाचा संकल्प करूया, असा संदेश देत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.