कुंभच्या कामामुळे उद्या रेल्वे वाहतुकीत बदल; ५ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले इगतपुरी-भुसावळ मार्गावरील ६ मेमू रद्द; मुंबई-हिंगोली जनशताब्दी मनमाडपर्यंतच
कुंभच्या कामामुळे उद्या रेल्वे वाहतुकीत बदल; ५ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले
इगतपुरी-भुसावळ मार्गावरील ६ मेमू रद्द; मुंबई-हिंगोली जनशताब्दी मनमाडपर्यंतच
![]() |
| लेवा जगत न्यूज वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा-8983689844 |
प्रतिनिधी भुसावळ-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ मार्गावर कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीत बदल करण्यात आले असून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
६ मेमू गाड्या रद्द
३० सप्टेंबर रोजी खालील मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत :
- 11113 देवळाली–भुसावळ मेमू
- 11114 भुसावळ–देवळाली मेमू
- 11119 इगतपुरी–भुसावळ मेमू
- 11120 भुसावळ–इगतपुरी मेमू
- 61130 बडनेरा–नाशिक मेमू
- 61129 नाशिक–बडनेरा मेमू
काही गाड्यांना १ ते ३ तास विलंब
ब्लॉकच्या दिवशी काही रेल्वेगाड्या भुसावळ–निफाड तसेच इगतपुरी–नाशिक दरम्यान नियंत्रित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित गाड्यांना १ ते ३ तासांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
जनशताब्दी मनमाडपर्यंतच
12072 हिंगोली डेक्कन–मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ३० सप्टेंबर रोजी मुंबईपर्यंत न जाता मनमाड स्थानकावरच थांबणार आहे. मनमाड–मुंबई दरम्यानची सेवा रद्द राहील.
तसेच 12071 मुंबई–हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईऐवजी मनमाडहून नियोजित वेळेनुसार सुटणार असून मुंबई–मनमाड दरम्यानची सेवा रद्द राहील.
५ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले
ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. यामध्ये अंकाई–दौंड कॉर्ड लाईन–पुणे–लोणावळा मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
यामध्ये :
- 15065 गोरखपूर–एलटीटी एक्स्प्रेस – २९ सप्टेंबर
- 11056 गोरखपूर–एलटीटी एक्स्प्रेस – २९ सप्टेंबर
- 22866 पुरी–एलटीटी एक्स्प्रेस – २९ सप्टेंबर रोजी सुटणारी
- 12534 मुंबई–लखनौ एक्स्प्रेस – ३० सप्टेंबर रोजी सुटणारी
यांचा समावेश आहे. मुंबई–लखनौ एक्स्प्रेस लोणावळा, पुणे, दौंड आणि अंकाई या पर्यायी मार्गाने धावणार आहे.
प्रवाशांनी ३० सप्टेंबर रोजी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती आणि वेळ तपासूनच प्रवास करावा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत