Contact Banner

संधी दिल्यास जिल्हा बँकेची निवडणूक लढेन : रक्षा खडसे

 

raksha-khadse-jdcc-bank-election-jalgaon

संधी दिल्यास जिल्हा बँकेची निवडणूक लढेन : रक्षा खडसे

प्रतिनिधी | जळगाव-


लेवा जगत न्यूज वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा-8983689844
लेवा जगत न्यूज वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा-8983689844

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे कोथळी, घोडसगाव आणि कर्की येथून मतदानासाठी ठराव मंजूर झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘जिल्हा बँक खडसेमुक्त करा’ अशी भूमिका मांडली होती.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रक्षा खडसे यांनी आपण जिल्हा बँकेची निवडणूक लढण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. “भाजपने संधी दिली, तर मी निश्चितपणे जिल्हा बँकेची निवडणूक लढेन,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, एसआयआरच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी हे फेक नरेटिव्हच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे आणि पाटील यांच्यातील या शाब्दिक संघर्षामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे आता लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.