Contact Banner

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये ‘गो गो गोविंदा’चा गजर गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहात दहीहंडी उत्सव

 


pre-primary-students-go-go-govinda-dahi-handi-godavari-english-medium-cbse-school-jalgaon

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये ‘गो गो गोविंदा’चा गजर

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहात दहीहंडी उत्सव

लेवाजगत न्यूज जळगाव : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये प्री-प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी ‘गो गो गोविंदा’च्या जयघोषात परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांच्या हस्ते दहीहंडी पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या आकर्षक वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘गोविंदा आला रे आला’ आणि ‘गो गो गोविंदा’ या गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व समजावे, तसेच त्यांच्यात एकोपा, सहकार्य व संघभावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दहीहंडी उत्सवाला आनंदमय आणि भक्तिमय वातावरणाची रंगत आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.