Contact Banner

पंजाब नॅशनल बँकेकडून सावदा पोलीस स्टेशनला २१ बॅरिकेड्स सुपूर्द सामाजिक बांधिलकीतून ८३ हजार रुपयांची मदत

 

punjab-national-bank-donates-21-barricades-worth-rs-83000-to-savda-police-station

पंजाब नॅशनल बँकेकडून सावदा पोलीस स्टेशनला २१ बॅरिकेड्स सुपूर्द

सामाजिक बांधिलकीतून ८३ हजार रुपयांची मदत

लेवाजगत न्यूज सावदा : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) वतीने सामाजिक बांधिलकी (CSR) उपक्रमांतर्गत सावदा पोलीस स्टेशनला तब्बल ८३ हजार रुपये किमतीचे २१ बॅरिकेड्स भेट देण्यात आले. शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी, या उद्देशाने बँकेने हा उपक्रम राबविला.

पंजाब नॅशनल बँकेच्या नाशिक सर्कल हेड श्रीमती नित्याकल्याणी, डेप्युटी सर्कल हेड श्री. अशोक आहुजा, चीफ मॅनेजर (मार्केटिंग, नाशिक) श्री. डी. श्रीनिवास तसेच सावदा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. रवी आव्हाड यांच्या प्रयत्नातून ही मदत उपलब्ध झाली.

शहरातील विविध अंतर्गत नाके, प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार मार्ग नियंत्रित करण्यासाठी हे बॅरिकेड्स उपयुक्त ठरणार आहेत. गणेशोत्सव, धार्मिक मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम तसेच इतर गर्दीच्या प्रसंगी वाहतूक व्यवस्थापन करताना पोलिसांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पोलिस प्रशासनाच्या कार्याला सहकार्य केल्याबद्दल सावदा पोलीस प्रशासनाच्या वतीने पंजाब नॅशनल बँकेचे आभार व्यक्त करण्यात आले. बँकेच्या या उपक्रमामुळे सामाजिक संस्था व व्यावसायिक आस्थापनांनीही समाजोपयोगी उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, असा सकारात्मक संदेश मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.