Contact Banner

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात

 

godavari-engineering-college-smart-india-hackathon-2026

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात

लेवाजगत न्यूज जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६ अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रमुख परीक्षक व युवा उद्योजक अजिंक्य तोतला, तसेच अधिष्ठाता आणि विविध विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झाले. प्रारंभी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अतुल बर्हाटे यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची संकल्पना, स्पर्धेचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या विविध संघांनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या विभागांमध्ये दिलेल्या समस्यांवर आधारित नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले.

स्पर्धेचे परीक्षण युवा उद्योजक अजिंक्य तोतला यांनी केले. अंतर्गत परीक्षणासाठी डॉ. निलेश चौधरी, डॉ. सचिन महेश्री आणि डॉ. किशोर महाजन यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

समारोपप्रसंगी अजिंक्य तोतला यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. संवादकौशल्य, शब्दसंग्रह, देहबोली आणि मुद्देसूद मांडणी यावर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच झालेल्या चुका ओळखून त्यातून शिकत पुढील संधींसाठी अधिक सक्षम होण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

विजेते संघ : प्रथम क्रमांक अल्गोनिक्स, द्वितीय क्रमांक डिजिटल टायटन्स, तर तृतीय क्रमांक अॅग्निटर्स एक्स संघाने मिळविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्धी भिरुड, मोईश नारखेडे, प्रतीक वारके आणि डिंकी शदानी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.