Contact Banner

राधेश्यामजी लक्ष्मीनारायणजी काबरा यांचे निधन

  

radheshyamji-laxminarayanji-kabra-passes-away-jalgaon


राधेश्यामजी लक्ष्मीनारायणजी काबरा यांचे निधन

लेवाजगत न्यूज जळगाव : येथील श्री. राधेश्यामजी लक्ष्मीनारायणजी काबरा यांचे सोमवारी (दि. ७) पहाटे ३.२० वाजता दुःखद निधन झाले. ते मदनलाल व सुरेश काबरा यांचे ज्येष्ठ बंधू, रविंद्र व जितेंद्र यांचे वडील तसेच तिलक व आदित्य यांचे आजोबा होते.

त्यांच्या निधनाने काबरा परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व नातेवाईक असा परिवार आहे.

त्यांची अंतिम यात्रा सोमवारी दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता ‘वृंदावन’, २०, चैत्रबन कॉलनी, महाबळ रोड, जळगाव येथील राहत्या निवासस्थानापासून निघून नेरी नाका वैकुंठधाम येथे जाणार आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो व काबरा परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.



radheshyamji-laxminarayanji-kabra-passes-away-jalgaon


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.