Contact Banner

रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्णयश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड

 

रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्णयश

रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्णयश

विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड

भुसावळ : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळच्या विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा २०२६ मध्ये आदित्यने अत्यंत अटीतटीच्या लढतीत प्रथम क्रमांक मिळवला. अचूक नेमबाजी, एकाग्रता आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या शानदार कामगिरीमुळे आदित्यची आगामी विभागीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड झाली आहे.

आदित्यच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आदित्यच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.