जळगावमध्ये ‘वोट चोरी’च्या आरोपांवरून काँग्रेसचे आंदोलन
जळगावमध्ये ‘वोट चोरी’च्या आरोपांवरून काँग्रेसचे आंदोलन
![]() |
| येथे जाहिरात प्रसिद्ध करायचे असल्यास लेवा जगत न्यूजशी संपर्क साधा-8983689844 |
लेवाजगत न्यूज जळगाव : मतदारांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न आणि ‘वोट चोरी’च्या आरोपांवरून जळगाव जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच यासंदर्भातील निवेदन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले.
या आंदोलनात जळगाव पूर्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी, जिल्हा पश्चिम काँग्रेस अध्यक्ष अविनाश भालेराव, जळगाव शहर काँग्रेस अध्यक्ष जमील शेख, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हारून मुफ्ती, जिल्हा निरीक्षक आरीज बेग, प्रदेश सचिव प्रविण सुरवाडे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, योगेंद्रभैय्या पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी लोकशाहीचे संरक्षण आणि मतदारांच्या अधिकारांसाठी घोषणाबाजी करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षतेची मागणी केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत