Contact Banner

सावदा येथे ३० बाय ३० फूट भव्य रांगोळीने संकल्प दिवस साजरा विद्यार्थिनींनी तिरंगा व राजमुद्रेची आकर्षक प्रतिकृती साकारली; मान्यवरांकडून कौतुक

 

savda-30x30-feet-rangoli-sankalp-din-students

सावदा येथे ३० बाय ३० फूट भव्य रांगोळीने संकल्प दिवस साजरा

विद्यार्थिनींनी तिरंगा व राजमुद्रेची आकर्षक प्रतिकृती साकारली; मान्यवरांकडून कौतुक

सावदा : येथील श्री आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींनी तब्बल ३० फूट बाय ३० फूट आकाराची भव्य रांगोळी साकारून संकल्प दिवस उत्साहात साजरा केला.

विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या तिरंगा ध्वजासह राजमुद्रेच्या प्रतीकांचा रांगोळीत सुंदरपणे वापर केला. विशेष म्हणजे ही भव्य रांगोळी साकारताना झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कडुनिंबाची पाने यांसारख्या विविध नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला. त्यासोबत रांगोळी व गुलालाचा वापर करून विद्यार्थिनींनी आकर्षक कलाकृती साकारली.

सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत अथक परिश्रम घेत विद्यार्थिनींनी ही रांगोळी पूर्ण केली. विद्यार्थिनींच्या या कलाकौशल्याचे कौतुक करण्यासाठी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. रेणुका राजेंद्र पाटील, शिक्षण सभापती श्री. सचिन चुडामण बऱ्हाटे, नगरसेविका सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे, नगरसेविका सौ. सुनीता संजय तायडे, तसेच श्री. प्रमोद चौधरी खक्के, श्री. सागर चौधरी, श्री. मनीष भंगाळे, श्री. संजय तायडे यांच्यासह सावदा शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थिनींना पेन भेट देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

ही रांगोळी पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साकारण्यात आली होती.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय मोतीराम महाजन यांनी मार्गदर्शन केले. कलाशिक्षक श्री. नंदकिशोर घनश्याम पाटील, श्री. अरुण छगन राठोड तसेच श्रीमती भारती सतीश भंगाळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून रांगोळी साकारण्यासाठी सहकार्य केले.

विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सावदा शहरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.