सावद्यात भुलाबाई महोत्सव उत्साहात; १६ संघांनी सादर केली पारंपरिक कला केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम; विविध गटांतील विजेत्यांचा गौरव
सावद्यात भुलाबाई महोत्सव उत्साहात; १६ संघांनी सादर केली पारंपरिक कला
केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम; विविध गटांतील विजेत्यांचा गौरव
लेवाजगत न्यूज सावदा, ता. रावेर : केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे भव्य भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. तालुकास्तरीय या महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून विविध गावांतील शाळा, मंडळे आणि महिला-युवतींच्या १६ संघांनी सहभाग नोंदविला.
भुलाबाईच्या पारंपरिक गीतांना आधुनिकतेची जोड देत सहभागी संघांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक संदेश प्रभावीपणे सादर केले. तीन वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून साई प्रसाद पुस्तकालयाच्या शुभांगी आखाडे, निकिता जाधव व पल्लवी निकुंभ उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण केशव स्मृती प्रतिष्ठानच्या डॉ. पूजा महाजन, देवयानी कोल्हे तसेच कोरिओग्राफर सचिन भिडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्थान स्व. गोदावरी पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.
यावेळी सावदा नगरसेविका रेखा वानखेडे, प्रतीक्षा भंगाळे, भाजप जिल्हा उपाध्यक्षा रेखा बोंडे, फैजपूर नगरसेविका जयश्री चौधरी, रावेर महिला मोर्चा अध्यक्षा आशा कोळी, बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका सारिका चव्हाण, नंदिनी पंत, रावेर नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. साई प्रसाद पुस्तकालयाचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर आभार रेखा बोंडे यांनी मानले.
असे होते तीन गट
- लहान गट : ३ ते १० वर्षे
- मोठा गट : ११ ते १६ वर्षे
- खुला गट : १७ वर्षे व त्यापुढील मुली व महिला
स्पर्धेचा अंतिम निकाल
लहान गट
🥇 प्रथम : मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर
🥈 द्वितीय : जि. प. शाळा, वडगाव
🥉 तृतीय : जि. प. शाळा, वाघोदा
🏅 उत्तेजनार्थ : शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्या मंदिर, न्हावी
मोठा गट
🥇 प्रथम : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा
🥈 द्वितीय : मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर
🥉 तृतीय : उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
🏅 उत्तेजनार्थ : भारत विद्यालय, न्हावी
खुला गट
🥇 प्रथम : भारत विद्यालय, न्हावी
🥈 द्वितीय : शिवकन्या मंडळ, साकळी (ता. यावल)
🏅 उत्तेजनार्थ : रोकडोबा हनुमान मंदिर मंडळ, कोचूर
#भुलाबाईमहोत्सव #सावदा #गोदावरीफाऊंडेशन #केशवस्मृतीप्रतिष्ठान #सावदा_भुलाबाई #रावेर #यावल #लेवाजगत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत