Contact Banner

सावद्यात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

 

savda-nagar-parishad-pani-puravatha-kami-dabane-28-29-september-2026

सावद्यात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा


savda-nagar-parishad-pani-puravatha-kami-dabane-28-29-september-2026


लेवाजगत न्यूज सावदा : सावदा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांसाठी जाहिर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मांगलवाडी हेडवर्क येथील ९० एचपी मुख्य मोटार पंपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तेथील विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागत आहे.

त्यामुळे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ आणि मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सावदा शहरातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

नागरिकांनी या दोन दिवसांत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, तसेच पाणीपुरवठा विभागाच्या कामात नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🙏 सर्व नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.