Contact Banner

सावदा श्री स्वामिनारायण मंदिरात पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी श्राद्ध विधी संपन्न

 

savda-shri-swaminayaran-mandir-pitrupaksha-shraddha-vidhi-27-september-2026

सावदा श्री स्वामिनारायण मंदिरात पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी श्राद्ध विधी संपन्न


savda-shri-swaminayaran-mandir-pitrupaksha-shraddha-vidhi-27-september-2026


लेवा जगत न्यूज सावदा : पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी, रविवार दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी, सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात श्राद्ध विधीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

वडताल निर्णयाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या श्राद्ध विधीसाठी यापूर्वी ज्या हरिभक्तांनी मंदिरात श्राद्ध करण्यासाठी नाव नोंदणी केली होती, त्यांच्या पूर्वजांच्या तिथीनुसार आज श्राद्ध विधी करण्यात आला. यावेळी संबंधित हरिभक्तांनी श्रद्धापूर्वक आपल्या पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध विधीत सहभाग घेतला.

यावेळी स्वामी सत्यप्रकाशदासजी यांच्या हस्ते श्राद्ध विधी पार पडला. पितृपक्षाच्या प्रारंभी मंदिरात झालेल्या या धार्मिक विधीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

ज्या नागरिकांना विविध अडचणींमुळे घरी श्राद्ध विधी करणे शक्य होत नाही, अशा नागरिकांसाठी मंदिरात श्राद्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित तिथीनुसार श्राद्ध विधी करता येणार आहे. इच्छुक हरिभक्तांनी मंदिराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्राद्ध विधीसाठी रु. ३५१/- अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी स्वामी सत्यप्रकाशदासजी मो. ८६६८९६२२२१ यांच्याशी संपर्क साधावा.

स्थळ : श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.