श्री र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यालयात जन्माष्टमी व शिक्षक दिन उत्साहात
श्री र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यालयात जन्माष्टमी व शिक्षक दिन उत्साहात
लेवाजगत भुसावळ : हिंदी सेवा मंडळ संचालित श्री र.न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, मटकी सजावट स्पर्धा आणि राधाकृष्ण युगल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या महामंत्री श्रीमती मधुलता शर्मा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सत्यनारायण गोडियाले तसेच विद्यालयाच्या प्रधानाध्यापिका सौ. रिता शर्मा उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची पूजा व आरती करण्यात आली.
महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
रंगभरण स्पर्धा २०२६ :
प्रथम – अमन सुपडू तडवी
द्वितीय – अलमीरा सलमान तडवी
तृतीय – बिलाल खान नदीम खान
चतुर्थ – अरीशा सय्यद भुरा
मटकी सजावट स्पर्धा २०२६ :
प्रथम – आरोही गायकवाड व शेख अलीना शकील
द्वितीय – कश्यप शाहिद खान
तृतीय – उमेश पवार
चतुर्थ – फरहान शेख मजहर
युगल जोडी स्पर्धा :
प्रथम – सह्याद्री सचिन जयस्वाल व आर्यन मनोज बालू
द्वितीय – फैजा नदीम खान व गजाली नदीम खान
तृतीय – देवांश परदेशी व प्रियल कबाडे
यावेळी शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहात दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी शिक्षकांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांचे श्रीमती मधुलता शर्मा व श्री सत्यनारायण गोडियाले यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री उमेश खोडपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत