Contact Banner

तरडगावच्या भजनी मंडळास आदर्श शिक्षक कुंडलिक सानप यांची ७० हजारांची अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट

 

taradgaon-adarsh-shikshak-kundalik-sanap-bhajani-mandal-sound-system-bhet

तरडगावच्या भजनी मंडळास आदर्श शिक्षक कुंडलिक सानप यांची ७० हजारांची अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट


taradgaon-adarsh-shikshak-kundalik-sanap-bhajani-mandal-sound-system-bhet


तरडगाव (प्रतिनिधी : सचिन पाटील) — “जे जे उत्तम ते आधी करावे” या विचाराची प्रचिती देत तरडगाव येथील आदर्श शिक्षक तथा रयत सेवक कुंडलिक सानप सर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तरडगाव येथील भजनी मंडळास अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट दिली.

विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे सानप सर हे भौतिकशास्त्र विषयावरील प्रभुत्वासोबतच सामाजिक जाणिवेची जपणूक करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. समाजाकडून मिळालेल्या प्रेमाचे आणि ऋणाचे भान ठेवून समाजातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला.

तंत्रज्ञानाच्या युगातील अहुजा कंपनीची सुमारे ७० हजार रुपये किमतीची अद्ययावत साऊंड सिस्टीम त्यांनी भजनी मंडळास सप्रेम भेट दिली. या साऊंड सिस्टीमचा उपयोग भजन, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी होणार आहे.

“केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीप्रमाणे सानप सर यांनी प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तरडगाव परिसरातून तसेच सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.