Contact Banner

गोदावरी फाउंडेशनच्या सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील गोदावरीच्या कार्याचे केले कौतुक

 

godavari-foundation-satkar-kulguru-dr-gite-arogya-shikshan-karyache-kautuk

गोदावरी फाउंडेशनच्या सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील गोदावरीच्या कार्याचे केले कौतुक




लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ३० सप्टेंबर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकटराव शाहुबाई अर्जुनराव गिते यांचा जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात विविध आरोग्य संस्थांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी गोदावरी फाउंडेशन संचलित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या वतीने डॉ. गिते यांचा विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या भव्य सत्काराने डॉ. गिते भारावून गेले. त्यांनी गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कार्याचे कौतुक करीत भविष्यात संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सी. डी. सारंग, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. शिरसाठ, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथीचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तथा संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विद्यानंद आठवले यांनी प्रास्ताविकातून गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्याचा तसेच विविध अभ्यासक्रमांच्या विस्ताराचा आढावा मांडला.

दरम्यान, संभाजी नाट्यगृह परिसरात गोदावरी फाउंडेशनच्या स्वागत फलकांनी लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमामुळे गोदावरी फाउंडेशनच्या विविध आरोग्य शिक्षण संस्थांमधील समन्वय तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी असलेले शैक्षणिक संबंध अधिक दृढ होण्यास चालना मिळाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.