Contact Banner

पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ. वर्षा पाटील फॅशन महाविद्यालयात गणरायाचे आगमन

 

traditional-instruments-welcome-ganray-deshulhas-patil-law-and-dr-varsha-patil-fashion-college-jalgaon

पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ. वर्षा पाटील फॅशन महाविद्यालयात गणरायाचे आगमन

जळगाव, दि. १४ सप्टेंबर : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान महाविद्यालय व डॉ. वर्षा पाटील फॅशन महाविद्यालयात सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच ढोल-ताशांच्या निनादात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात महाविद्यालय परिसरात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी डॉ. उल्हास पाटील विधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. झोपे आणि डॉ. वर्षा पाटील फॅशन महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता देशमुख यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना करण्यात आली.

गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणाने भारावून गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.