भक्तिमय वातावरणात डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
भक्तिमय वातावरणात डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
जळगाव, दि. १४ सप्टेंबर : डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे गणरायाचे मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात आगमन झाले.
गणरायाच्या आगमनानिमित्त महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला. उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढून महाविद्यालयात बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.
गणरायाच्या आगमनानंतर उपस्थितांनी भक्तिभावाने आरती करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी मंगलमय प्रार्थना केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणरायाच्या आगमनाचा सोहळा अधिकच आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’ या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत