वामन जयंतीनिमित्त श्री स्वामीनारायण मंदिरात विशेष कार्यक्रम
वामन जयंतीनिमित्त श्री स्वामीनारायण मंदिरात विशेष कार्यक्रम
लेवाजगत न्यूज सावदा : येथील श्री स्वामीनारायण मंदिरात वामन जयंतीनिमित्त बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वामन जयंतीच्या पावन पर्वानिमित्त दुपारी १२ वाजता श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधाकृष्ण देव यांची आरती करण्यात येणार आहे. यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना आरती व दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी तसेच हरिभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामीनारायण मंदिर, सावदा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत