तापी परिसर विद्यामंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षपदी बिनविरोध; विविध पदांवर उमेदवार विजयी
तापी परिसर विद्यामंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षपदी बिनविरोध; विविध पदांवर उमेदवार विजयी
फैजपूर (ता. यावल) | लेवाजगत प्रतिनिधी-
तापी परिसर विद्यामंडळ, फैजपूर (ता. यावल, जि. जळगाव) या संस्थेची सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष, व्हाईस चेअरमन आणि सचिव या तीन पदांची निवड बिनविरोध झाली, तर चेअरमन व सहसचिव पदांसाठी मतदान घेण्यात आले.
बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी
संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांची, व्हाईस चेअरमनपदी प्रा. किशोर रामदास चौधरी यांची, तर सचिवपदी मुरलीधर तोताराम फिरके यांची बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार विजयी
उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये नंदकुमार आसाराम भंगाळे यांनी २४ मते, तर शशिकांत सदाशिव पाटील यांनी २१ मते मिळवून विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी उमेदवार मधुकर चुडामण पाटील यांना ६ मते मिळाली.
चेअरमनपदी सुधाकर चौधरी विजयी
चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुधाकर काशिनाथ चौधरी यांनी १८ मते मिळवून विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी मिलिंद शंकर वाघुळडे यांना ९ मते मिळाली.
सहसचिवपदी धनंजय चौधरी विजयी
सहसचिवपदाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत धनंजय शिरीष चौधरी यांनी २० मते मिळवून विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. मिलिंद काशिनाथ महाजन यांना ८ मते मिळाली.
या निवडणुकीत विविध पदांवर विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे संस्थेच्या सभासदांकडून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी कार्यकाळात संस्थेच्या शैक्षणिक व संस्थात्मक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत