डॉ.विश्वनाथ महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन
डॉ.विश्वनाथ महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन
अहिरवाडी, ता. रावेर : अहिरवाडी येथील रहिवासी डॉ. विश्वनाथ सिताराम महाजन (वय ८१) यांचे २३ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाजन कुटुंबीयांसह परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. विश्वनाथ महाजन यांच्या पश्चात एक मुलगा, भाऊ, पुतणे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते वाघोदा येथील चक्रधर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्रावण महाजन यांचे भाऊ होते. तसेच जागृती पतसंस्थेचे चेअरमन अनिल महाजन, मदन महाजन, गोकुळ महाजन आणि प्रमोद महाजन यांचे ते काका, तर कन्हैया महाजन यांचे वडील होते.
त्यांच्या निधनाने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व परिचितांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत