Contact Banner

ग.स.सोसायटीचे संचालक भाईदास पाटील यांचे निधन; सहकार क्षेत्रात शोककळा

 


ग.स.सोसायटीचे संचालक भाईदास पाटील यांचे निधन; सहकार क्षेत्रात शोककळा



लेवाजगत न्यूज जळगाव : ग. स. सोसायटी, जळगावचे विद्यमान सहकारी संचालक भाईदास बाजीराव पाटील (वय ५९) यांचे बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी सोनवद, ता. धरणगाव येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती नारायण पाटील तसेच धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील यांचे बंधू होत. भाईदास पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाबद्दल सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.