यावल येथे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
यावल येथे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
चोपडा रोडवरील जुन्या फॉरेस्ट कॉलनीतील घटना; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
यावल, प्रतिनिधी : यावल शहरातील चोपडा रोडवरील जुन्या फॉरेस्ट कॉलनी परिसरात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशीष संजय खेडकर (वय २८, रा. यावल) हा तरुण आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रिंगणाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत