भाजपा जळगाव महानगर जिल्हा ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
भाजपा जळगाव महानगर जिल्हा ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
लेवाजगत न्यूज जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आणि विभाग संघटनमंत्री रविजी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार अमोलदादा जावळे तसेच जिल्हाध्यक्ष दिपक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील रामदास वाणी यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी सुनील रामदास वाणी, उपाध्यक्षपदी प्रवीण तापिराम पाटील, समाधान जगन्नाथ चौधरी व रवींद्र पांडुरंग सोनवणे, सरचिटणीसपदी सुनील प्रभाकर शिंपी व अतुल सुधाकर पाटील, चिटणीसपदी निवृत्ती गोकुळ पाटील, किरण विलास मोराणकर व राजागोपालदास नारायण पालीवाल, सोशल मीडिया प्रमुखपदी ऋषिकेश प्रकाश खारोळे तर प्रसिद्धी प्रमुखपदी रोहन गजानन लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रशांत उखा शिंदे, विनोद शांताराम चौधरी, सुरेश मिथाराम पाटील, आकाश संजय वाघ, अमर दिलीप वंजारी, दिपक ओंकार पाटील, प्रवीण कौतिक मोरे, अमर दिलीप वंजारी आणि तेजस सुनील वाणी यांचा समावेश करण्यात आला आहे.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून जळगाव महानगर परिसरात ओबीसी मोर्चाचे संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये पदाधिकारी व सदस्य सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील रामदास वाणी यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत