चिनावलच्या नवनाथ मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ; ५१ स्वामी सेवेकऱ्यांचा सहभाग
चिनावलच्या नवनाथ मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ; ५१ स्वामी सेवेकऱ्यांचा सहभाग
लेवा जगत न्यूज | चिनावल-
चिनावल येथील श्री क्षेत्र जागृत नवनाथ मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात ५१ स्वामी सेवेकऱ्यांनी दुर्गा सप्तशतीच्या पाठात सहभागी होऊन आध्यात्मिक सेवेचा लाभ घेतला.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, दुर्गा सप्तशतीच्या पाठामुळे परिसरात धार्मिक चैतन्य अनुभवायला मिळत आहे. देवीची आराधना, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने सुरू असलेल्या या उपक्रमातून भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळत आहे.
श्री क्षेत्र जागृत नवनाथ मंदिरातील या धार्मिक उपक्रमामुळे नवरात्रोत्सवाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत