Contact Banner

जिल्हा-बँक-खडसे-कुटुंबीयांच्या-ठरावांवरील-हरकती-फेटाळल्या

 

jilha-bank-khadse-family-tharav-harkati-fetallya

जिल्हा-बँक-खडसे-कुटुंबीयांच्या-ठरावांवरील-हरकती-फेटाळल्या

मुक्ताईनगर | लेवाजगत न्यूज

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील खडसे कुटुंबीयांच्या नावाने करण्यात आलेल्या ठरावांवरून निर्माण झालेल्या वादाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधील ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी दाखल केलेल्या चारही हरकती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी फेटाळल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव, कर्की आणि कोथळी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नावाने ठराव करण्यात आले होते. तर सालबर्डी येथील सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करण्यात आला होता.

या ठरावांना आक्षेप घेत आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी संबंधित चारही ठिकाणी हरकती दाखल केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.

घोडसगाव येथील सोसायटीसाठी रमेश निळकंठ देशमुख (रा. घोडसगाव), कर्की विकासो संस्थेसाठी नारायण सिताराम पाटील (रा. पिंपरी पंचम), कोथळी येथील सोसायटीसाठी गोविंद आनंदा राणे (रा. कोथळी) आणि सालबर्डी येथील सोसायटीसाठी रवींद्र रामा बढे (रा. सालबर्डी) हे अर्जदार होते. या चारही प्रकरणांत आमदार चंद्रकांत पाटील यांनी हरकत घेतली होती.

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दिलेल्या आदेशानुसार चारही हरकती फेटाळण्यात आल्या. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे.

या निर्णयानंतर खडसे कुटुंबीयांच्या नावाने करण्यात आलेल्या संबंधित ठरावांबाबतचा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.