मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
चाळीसगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री अण्णासाहेब श्री. एम. के. पाटील यांनी मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण आणि भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाटील उपस्थित होते.
या भेटीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी असलेली तळमळ, तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांची विकासाभिमुख कार्यशैली यांचा विशेष उल्लेख केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या विकासकामांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री पाटील यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या गौरवपूर्ण प्रतिक्रियेला दाद देत आमदार चव्हाण यांच्या कार्याची प्रशंसा केली.
राज्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून मिळालेली ही कौतुकाची थाप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकासकार्याला निश्चितच नवी ऊर्जा देणारी ठरणार आहे.
याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील यांनी आपल्या जीवनप्रवासावर आधारित ‘इथेनॉल मॅन’ हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सस्नेह भेट म्हणून प्रदान केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत