Contact Banner

बोरी नदीच्या पात्रात चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

bori-river-attack-knife-iron-rod-two-accused-booked-amalner

बोरी नदीच्या पात्रात चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल



अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील आंबेडकर भवनाजवळ बोरी नदीच्या पात्रात दोन तरुणांवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकिब शेख हा त्याचा मित्र अल्तमश शेख याच्यासोबत १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता आंबेडकर चौकातून घरी जात होता. यावेळी शरद उर्फ दादू वासू पारधी याने फोन करून दोघांना बोरी नदीच्या पात्रात बोलावून घेतले.

दोघे तेथे पोहोचल्यानंतर शरद उर्फ दादू याने चाकूने अल्तमश शेख याच्या पाठीवर वार करून त्याला जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच मोन्या चंडाले याने लोखंडी रॉडने आकिब शेख याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर मारून त्याला दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर दोन्ही तरुणांनी तेथून निघून अमळनेर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून शरद उर्फ दादू वासू पारधी आणि मोन्या चंडाले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.