Contact Banner

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

 

dhanaji-nana-college-faizpur-students-selected-for-divisional-sports

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

लेवाजगत न्यूज फैजपूर : जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत फैजपूर येथील धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या यशाच्या जोरावर महाविद्यालयातील खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आणि बॅडमिंटन अशा विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले.

या स्पर्धेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या पूर्वेश सुरेश तायडे याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच पूर्वेश विश्वनाथ पाटील याने थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. बॅडमिंटन स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये टीना विजय धनगर, राधिका प्रसन्न गचके आणि लीना दुर्गादास सराफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, मेहनत आणि चिकाटी महत्त्वाची ठरली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोविंद मारतळे, प्रा. दिलीप बोदडे आणि प्रा. पूनम कोल्हे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा मधुकरराव चौधरी तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातून आणि पालकवर्गातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.