डोंगर कठोरा येथे शीतला माता दुर्गोत्सव मित्र मंडळातर्फे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबाळे यांचा सत्कार
डोंगर कठोरा येथे शीतला माता दुर्गोत्सव मित्र मंडळातर्फे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबाळे यांचा सत्कार
डोंगर कठोरा : नवरात्रोत्सवानिमित्त डोंगर कठोरा येथील शीतला माता दुर्गोत्सव मित्र मंडळाच्या वतीने यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धारबाळे यांनी शीतला माता मंदिरात आरती केली.
मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात धीरज भोळे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबाळे यांचा सत्कार करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरणात आरती संपन्न झाली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी संदीप वासुदेव कोलते, लोकेश प्रदीप सरोदे, तेजस प्रदीप सरोदे, यश संजय सरोदे, विनोद मधुकर राणे, चेतन निळकंठ सरोदे, विजय रमेश जंगले, पुनीत नरेंद्र राणे, मयूर लीलाधर जंगले, मोहित भरत जंगले, युगल तुषार सरोदे, सचिन गंगाधर जंगले, सोपान लीलाधर पाटील, मधुकर जंगले, लुकेश लीलाधर फेगडे, प्रदीप सुरेश सरोदे, तुषार सुरेश सरोदे, यश जितेंद्र वायकोळे, तुषार युवराज भिरूड, श्रीकांत युवराज भिरूड, सचिन रविंद्र फेगडे आदी उपस्थित होते.
बातमी व छायाचित्र : सुनील मेघे, प्रतिनिधी, लेवाजगत न्यूज, डोंगर कठोरा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत