Contact Banner

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्री उत्सव उत्साहात; गरबा-दांडियाने परिसर नवरंगात रंगला

dr-ulhas-patil-english-medium-school-savda-navratri-utsav-2026



 डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्री उत्सव उत्साहात; गरबा-दांडियाने परिसर नवरंगात रंगला



लेवाजगत न्यूज सावदा : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे १४ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्री उत्सवानिमित्त गरबा व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंदाचा जल्लोष केला.

उत्सवाच्या प्रत्येक दिवशी विद्यार्थी व पालकांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरबा आणि दांडियाचा आनंद लुटला. रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक संगीत आणि तालबद्ध नृत्यामुळे शाळेचा परिसर नवरात्रमय झाला होता.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळच्या अध्यक्षा रजनिताई सावकारे उपस्थित होत्या. दुसऱ्या दिवशी सावदा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. तिसऱ्या दिवशी प.पू. महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.

विद्यार्थ्यांना गरबा व दांडियाचे प्रशिक्षण देण्यासाठी सचिन भिडे व त्यांच्या टीमने विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने गरबा व दांडिया सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या उत्सवाचे नियोजन व आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी सहकार्य केले.

नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व अनुभवता आले. आनंद, उत्साह आणि एकोप्याचा संदेश देणारा हा उत्सव विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.