Contact Banner

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सौहार्दपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

 

dr-ulhas-patil-medical-college-ragging-prevention-committee-review-meeting-jalgaon

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सौहार्दपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर




जळगाव, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. महाविद्यालय परिसर रॅगिंगमुक्त ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सन्मान, मैत्रीपूर्ण संबंध आणि सकारात्मक संवाद वाढविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.



महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विद्यमान रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, रेक्टर सुरेंद्र गावंडे, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, चेतन साखरे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वराज व मुस्कान तसेच लिपिक ललित बोंडे उपस्थित होते.


नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेताना कोणत्याही प्रकारचा मानसिक अथवा शारीरिक त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी नियम, त्याचे गांभीर्य आणि तक्रार नोंदविण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांची माहिती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.


महाविद्यालयातील विविध विभागांसह वसतिगृह परिसरात नियमित पाहणी करणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि आवश्यकतेनुसार समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देणे, याबाबतही बैठकीत चर्चा झाली.


रॅगिंगमुक्त, सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक संवाद वाढविण्यासाठी पुढील महिन्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.