डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज जळगाव : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता शितल कुमार देशमुख आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नदीम शेख यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. नदीम शेख यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व विशद करत मार्गदर्शन केले. डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थिनींना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. पुस्तके ही ज्ञानप्राप्ती, विचारांची समृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वपूर्ण साधने असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचनसंस्कृतीचे महत्त्व जाणून घेतले. तसेच ज्ञानात भर घालण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ. कविता राहुल भोरटके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीमती मीनल राणे, प्रा. जयश्री कुलकर्णी आणि प्रा. कोमल भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत