आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धा ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धा
‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती
जळगाव : आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या वतीने ऑनलाइन झूम प्लॅटफॉर्मद्वारे राष्ट्रीय स्तरावरील रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
महिला प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभाग आणि नर्सिंग स्कॉलर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेची संकल्पना ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ अशी होती. बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण याविषयी समाजात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १,५०० रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी १,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. उपप्राचार्य प्रा. जॅकनिथ धाया सी. तसेच सुरत येथील व्हायब्रंट नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. अलका ताजने यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले.
नर्सिंग स्कॉलर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. बिनू जो, महिला प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागाच्या प्रमुख प्रा. मेनाओ देवी खुराईजम, प्रा. स्नेहल जांभूळकर, प्रा. कोलेट लोंढे (एम.एस्सी. ट्यूटर), प्रा. अहिंसा लोखंडे आणि प्रा. निकिता रामटेके यांनी एम.एस्सी. नर्सिंग प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. रील्सच्या माध्यमातून बालविवाहविरोधी संदेश प्रसारित करून मुलींच्या शिक्षणाचे, सुरक्षिततेचे आणि समान हक्कांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत