गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश खो-खोमध्ये पुरुष व महिला संघ विजेते; महिला कबड्डी संघाला रौप्यपदक
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश
खो-खोमध्ये पुरुष व महिला संघ विजेते; महिला कबड्डी संघाला रौप्यपदक
जळगाव, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी व खो-खो स्पर्धा आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.
कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला संघाला एस. व्ही. के. एम., दहिवड संघाविरुद्ध २४-२९ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महिला संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले.
खो-खो स्पर्धेत मात्र गोदावरी महाविद्यालयाच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात गोदावरीच्या संघाने आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाचा १०-०० गुणांनी पराभव केला. तर महिला खो-खो संघाने अंतिम सामन्यात एस. एस. बी. टी. महाविद्यालय, बांभोरीच्या संघाला ०८-०२ गुणांनी पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला.
या यशस्वी खेळाडूंचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव तसेच सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी दाखविलेली मेहनत, सांघिक भावना आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्य यांचे सर्वत्र कौतुक होत असून, महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रति, मा. संपादक महोदय, दैनिक __________, जळगाव.
विषय : बातमी प्रसिद्ध करण्याबाबत.
महोदय,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत