Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग समिती प्रथम, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग समिती द्वितीय क्रमांकावर

 

godavari-engineering-college-student-committees-inauguration-ceremony-jalgaon

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग समिती प्रथम, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग समिती द्वितीय क्रमांकावर

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव येथे विविध विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सांघिक भावना, तांत्रिक कौशल्ये आणि सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, परीक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.

यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन या विद्यार्थी संघटनांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज प्रदान करण्यात आले.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्पणाने पार पाडाव्यात आणि महाविद्यालयाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.

विविध विद्यार्थी समित्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण तंत्रनिकेतनच्या संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. अमिता महाजन आणि विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. कल्याणी पाटील यांनी केले. या स्पर्धेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनने प्रथम, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनने द्वितीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्धी भिरूड, गुंजन महाजन, संजना गवई आणि कीर्ती बोरोले यांनी केले. सामूहिक छायाचित्रानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या समारंभामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण विकसित करण्याची, नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्याची आणि महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.