गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाची धूम; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवले कलागुण
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात
पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाची धूम; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवले कलागुण
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाचा ताल आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे महाविद्यालय परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
या उत्सवानिमित्त बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट, बेस्ट कपल दांडिया आणि ग्रुप गरबा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच गरबा किंग आणि गरबा क्वीन यांचीही निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत आपले कलागुण सादर केले.
नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य तथा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट स्पर्धेत सानिका कारंडे आणि रोहित पाटील यांनी बाजी मारली. बेस्ट कपल दांडिया स्पर्धेत अनुष्का बर्हाटे आणि सुमित थिगळे यांची निवड झाली. ग्रुप गरबा स्पर्धेत एल.वाय. ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. गरबा किंगचा मान वृषभ सुतार याला, तर गरबा क्वीनचा मान अश्विनी ठाकरे हिला मिळाला.
या नवरात्रोत्सवाचे समन्वयन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी केले, तर विद्यार्थिनी देवयानी पाटील हिने सूत्रसंचालन केले.
नवरात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजक तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत