Contact Banner

माहिती अधिकार सप्ताह ५ ते १२ ऑक्टोबरदरम्यान कलम ४ अंतर्गत माहिती अद्ययावत करून प्रसिद्ध करण्याचे निर्देश

 

information-rights-week-jalgaon-october-5-to-12-2026-section-4-information-update

माहिती अधिकार सप्ताह ५ ते १२ ऑक्टोबरदरम्यान

कलम ४ अंतर्गत माहिती अद्ययावत करून प्रसिद्ध करण्याचे निर्देश




लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ५  : माहितीचा अधिकार अधिनियम, २००५च्या तरतुदींचा व्यापक प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी ५ ते १२ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘माहिती अधिकार सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ४ नुसार स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती अद्ययावत करून ती जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक प्राधिकरणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.