आयटीआयमध्ये तासिका तत्वावरील निर्देशकांच्या नियुक्तीसाठी ७ ऑक्टोबरला परीक्षा
आयटीआयमध्ये तासिका तत्वावरील निर्देशकांच्या नियुक्तीसाठी ७ ऑक्टोबरला परीक्षा
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ५ : कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट २०२६ साठी विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर निर्देशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच मुलाखत बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेत घेण्यात येणार आहे.
या नियुक्तीसाठी टीडीएम (जे अँड एफ) – १, पीपीओ – १, यांत्रिक डिझेल – १, यांत्रिक मोटारगाडी – १ आणि फॉड्रीमॅन – १, अशा एकूण ५ जागा उपलब्ध आहेत.
संबंधित व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी अर्जासह शैक्षणिक पात्रतेची तसेच आवश्यक कागदपत्रांची मूळ व साक्षांकित प्रती घेऊन नियोजित वेळेत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही नियुक्ती पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसह मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता दिला जाणार नाही, असे संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुळकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत