लेवा पाटीदार समाजाची स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार पटेल यांना सामूहिक मानवंदना एकतानगर येथे १५१ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक सोहळा; ‘सरदार गाथा’ने उपस्थित भारावले — महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व नोबेल टुरिझमचा स्तुत्य उपक्रम
लेवा पाटीदार समाजाची स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार पटेल यांना सामूहिक मानवंदना
एकतानगर येथे १५१ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक सोहळा; ‘सरदार गाथा’ने उपस्थित भारावले — महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व नोबेल टुरिझमचा स्तुत्य उपक्रम
लेवाजगत न्यूज | विशेष वृत्त-
एकतानगर (गुजरात) : लेवा पाटीदार समाजाचे मानबिंदू आणि अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतानगर येथे लेवा पाटीदार समाजाच्या वतीने सामूहिक सलामी व मानवंदना अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आणि नोबेल टुरिझम, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक ‘सरदार यात्रा अभ्यास व प्रेरणा सहल’ २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडली. या उपक्रमातून सामाजिक एकीकरण, राष्ट्रप्रेम आणि सरदार पटेल यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
सामूहिक मानवंदनेतून सामाजिक एकतेचा संदेश
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सामाजिक एकीकरण दिनाच्या निमित्ताने सामूहिक सलामी व मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांची नियोजनबद्ध आखणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या प्रथेनुसार अलीकडच्या काळात दिवंगत झालेल्या ज्ञात-अज्ञात समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि आई बहिणाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा महासंघाच्या परंपरेनुसार शब्दसुमनांनी स्वागत व सत्कार करण्यात आला.
यानंतर सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामूहिक मानवंदना देण्यात आली. नंदुरबार येथील सरदार गाथा सादरकर्ते हेमंत पाटील यांनी तयार केलेली प्रार्थना सादर करण्यात आली. यावेळी सरदार पटेल यांची आरतीही करण्यात आली.
‘सरदार गाथा’ने उपस्थितांच्या डोळ्यांत आणले अश्रू
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेली ‘सरदार गाथा’ उपस्थितांच्या मनाला भावून गेली. नंदुरबार येथून आलेले हेमंत पुरुषोत्तम पाटील, राजश्री हेमंत पाटील, मणिबेन यांची भूमिका साकारणाऱ्या अनामिका नरोत्तम चौधरी आणि जगन्नाथ तुकाराम पाटील यांनी निवडक प्रसंगांच्या माध्यमातून सरदार पटेल यांचे जीवनकार्य प्रभावीपणे उलगडून दाखवले.
सुमारे दीड तास चाललेल्या या सादरीकरणात सरदार पटेल यांचे राष्ट्रप्रेम, त्यांचे योगदान आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग जिवंत करण्यात आले. विशेषतः मणिबेन यांचे स्वगत ऐकताना उपस्थित भावुक झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
हेमंत पाटील हे तब्बल दहा तासांची सरदार गाथा सादर करतात. मात्र, वेळेच्या मर्यादेमुळे त्यांनी या कार्यक्रमात निवडक प्रसंगांच्या माध्यमातून अल्पावधीतच सरदार पटेल यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे उभे केले. त्यांच्या सादरीकरणातून कौशल्यासोबतच राष्ट्रपुरुषाविषयीची निष्ठा आणि प्रेम दिसून आले.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
मान्यवरांनी मांडले सामाजिक एकतेचे विचार
यावेळी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी सरदार पटेल यांचे जीवनकार्य आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. या ऐतिहासिक सहलीला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
निवडक मान्यवरांनी सामाजिक विषयांवर आपले विचार मांडले. समाजातील एकोपा वाढवणे, नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देणे आणि संघटनात्मक बांधिलकी दृढ करणे, अशा विविध विषयांवर या उपक्रमातून सकारात्मक संदेश देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, नोबेल टुरिझमचे प्रमुख सचिन भोळे, महासंघाचे सचिव दिलीप नाफडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद महाजन, पुरुषोत्तम पिंपळे, खान्देश विभाग समुपदेशन समितीचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे, खान्देश सेना अध्यक्ष सुहास दादा बोंडे, गुजरात विभागाचे उपाध्यक्ष प्रवीण झांबरे, अहमदाबाद मंडळाचे अध्यक्ष भी. का. पाटील, महासंघाचे उपाध्यक्ष विकास वारके, निळकंठ चौधरी, महेश बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, रत्नाकर चौधरी, नितीन जावळे, कामिनी जावळे, नीता वराडे, निलिमा नेहेते, हर्षल जावळे, ॲड. हितेंद्र पाटील, राजेश शांताराम पाटील, प्रतिभा चौधरी, स्मिता चौधरी, प्रसिद्धीप्रमुख नितीन सरोदे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सरदार गीत’ आणि वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता
महासंघाचे सचिव दिलीप नाफडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. सौ. प्रणिता झोपे आणि महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस कवी तथा महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी स्वतः रचलेले ‘सरदार गीत’ सौ. नीता वराडे, साधना लोखंडे, सौ. प्रीती इंगळे, सौ. पुष्पा पाटील, सौ. प्रणिता झोपे आणि डॉ. प्रा. किरण चौधरी यांच्या सहकार्याने सादर केले. साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्टॅच्यू ऑफ युनिटीसह विविध पर्यटनस्थळांना भेटी
तीन दिवसांच्या या सहलीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिला भगिनींचा उत्साह उल्लेखनीय होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील सरदार पटेल यांच्या भव्य स्मारकासमोर समाजबांधवांनी नतमस्तक होत अभिवादन केले.
याशिवाय जंगल सफारी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, कॅक्टस गार्डन आदी पर्यटनस्थळांना भेटी देण्यात आल्या. श्री कुबेर भंडारी आणि निळकंठ धाम येथे दर्शन घेऊन सहभागी भाविकांनी आध्यात्मिक अनुभूती घेतली.
सहलीच्या चौथ्या दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी, ऐच्छिक कार्यक्रमांतर्गत लेवा पाटीदार समाजाची कुलदेवता पावागड निवासिनी कालिका मातेचे दर्शन घेण्यात आले.
विविध शहरांतील समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
या ऐतिहासिक सहलीत जळगाव, भुसावळ, पुणे, मुंबई, नाशिक, मलकापूर, बुलढाणा, अकोला तसेच गुजरातमधील विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव आणि भगिनी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाने आयोजित केलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल सहभागी सदस्यांनी समाधान व्यक्त केले. नोबेल टुरिझम, नाशिकचे सचिन भोळे आणि सौ. हर्षा भोळे यांनी सहलीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
सरदार पटेल यांच्या राष्ट्रएकात्मतेच्या विचारांना उजाळा देणारी ही सहल केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता सामाजिक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत