महादेव व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात शस्त्र व साहित्य पूजन
महादेव व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात शस्त्र व साहित्य पूजन
जळगाव : विजयादशमीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच महादेव रुग्णालय येथे शस्त्र व साहित्य पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरणे व साहित्याचे पूजन करण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बायोमेडिकल विभागात आयोजित कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांनी शस्त्र व साहित्याचे पूजन केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख विजय चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यानंतर महादेव रुग्णालयात आरोग्यदेवता भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे तसेच वैद्यकीय उपकरणांचे पूजन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते हा विधी पार पडला. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आरोग्यसेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. डॉ. दीपक झांबरे यांच्या हस्ते यंत्रसामग्रीचे पूजन करण्यात आले. तसेच गोदावरी संगीत महाविद्यालयात प्राचार्या पद्मजा नेवे यांच्या हस्ते संगीत वाद्यांचे पूजन करण्यात आले.
विविध संस्थांमध्ये पार पडलेल्या या पूजन सोहळ्यांतून विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या कार्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या साधनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा या निमित्ताने जपण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत